Tuesday 15 March 2016

गुगल प्लेस्टोअरमधील 3 अॅपवर भारतीय लष्कराने घातली बंदी

नवी दिल्ली, दि. १५ - भारतीय लष्कराने गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध असणा-या 3 अॅपवर बंदी घातली आहे. पाकिस्तान या अॅपच्या सहाय्याने भारतीय लष्कराची महत्वाची माहिती मिळवत असल्याचा धोका असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. वीचॅट, स्मेश आणि लाईम हे अॅप डाऊनलोड न करण्याची सुचना भारतीय लष्कराने फेब्रुवारी महिन्यात जवानांना दिली आहे.  
 
सीएनएन - आयीबएनने दिलेल्या वृत्तानुसार गुगलने याअगोदरच स्मेश हे अॅप काढून टाकले आहे. पाकिस्तान या अॅपच्या सहाय्याने भारतीय लष्कराच्या जवानांवर लक्ष ठेवत असल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर हे अॅप काढून टाकण्यात आलं होतं.  लष्कराच्या तुकड्यांची हालचाल तसंच दहशतवादी हल्यांविरोधातील कारवाईची माहिती या अॅपच्या सहाय्याने पाकिस्तानला मिळत होती. 
 
भारतीय लष्कराने जवानांना लोकेशन नोटिफिकेशनदेखील बंद ठेवण्यास सांगितलं आहे. आयएसआय सॉफ्टवेअरच्या सहाय्याने भारतीय जवानांचे स्मार्टफोन टॅब करुन ही मिळवत असल्याचं तपासात समोर आलं होतं. पठाणकोट हल्लावेळीदेखील जवानांच्या हालचालीची माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी हँण्डलर याच पद्धतीचा वापर करत असल्याचं तपासात स्पष्ट झालं होतं. 
 

No comments:

Post a Comment