Tuesday 15 March 2016

सकारात्मक संदेश देण्याचा उद्देश होता-आफ्रिदी

मंगळवार, 15 मार्च 2016 - 04:025 PM 
कोलकता - पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त प्रेम मिळत असल्याचे वक्तव्य केल्याने अडचणीत आलेला पाकिस्तान कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपला यातून सकारात्मक संदेश देण्याचा हेतू असल्याचे म्हटले आहे.

भारतात ट्वेंटी-20 विश्वकरंडक खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार आफ्रिदी आणि शोएब मलिक यांनी भारताचे गुणगान गात पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त प्रेम मिळत असल्याचे म्हटले होते. यावर पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमी आणि माजी क्रिकेटपटूंकडून आफ्रिदीवर जोरदार टीका करण्यात आली. आफ्रिदीला कायदेशीर नोटीसही पाठविण्यात आली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना आफ्रिदी म्हणाला की, दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांना सकारात्मक संदेश देण्यासाठी आपण हे वक्तव्य केले होते. मी फक्त येथे पाकिस्तान संघाचा कर्णधार म्हणून आलो नाही, तर मी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे माझे वक्तव्याचा सकारात्मक अर्थ घ्यावा. माझी पूर्ण ओळख पाकिस्तानमुळे आहे. 

No comments:

Post a Comment