आणखी संबंधित बातम्या |
- मुंबई, दि. ८ - कांदिवली येथे सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर दोन्ही दिशांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर गाडया वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहेत. युद्धपातळीवर सिग्नलमधील बिघाड दूर करुन वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सिग्नलमधील बिघाडामुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांचा खोळंबा होत आहे. संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्वपदावर आली नाही तर, कामावरुन घरी परतणा-या प्रवाशांचे हाल होऊ शकतात.
No comments:
Post a Comment