मुंबई, दि. १५ - गेल्या वर्षीच्या बहुचर्चित 'बाजीराव मस्तानी' चित्रपटाने सर्वांची वाहवा मिळवत बहुसंख्य पुरस्कार तर पटकावलेच पण बॉक्स ऑफीसवरही तूफान कामगिरी दाखवत बराच गल्ला कमवला. पण या चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवरील रेकॉर्ड आता मोडला गेला आहे. 'लव्ह पंजाब' या पंजाबी चित्रपटाने बाजीराव मस्तानी व एअरलिफ्टपेक्षा जास्त कमाई करत नवा विक्रम रचला.
या चित्रपटात पंजाबी अभिनेता व गायर अमरिंदर गिल व सरगुन मेहता यांनी प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. हा एक कौटुंबिक चित्रपट असून राजीव धिंग्राने त्याचे दिग्दर्शन केले आहे. आपल्या मुलाला एकत्र कुटुंबाचे महत्व पटवून देण्यासाठी एक जोडपं पंजाबला येतं आणि तिथे काय घडतं, याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले .
- हा चित्रपट परदेशात खूप यशस्वी ठरला असून अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. या चित्रपटाची ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँडमधील कमाई ही अक्षय कुमारचा एअरलिफ्ट व रणवीर सिंगच्या बाजीराव-मस्तानीपेक्षाही अधिक झाली आहे.' बॉक्स ऑफीस ट्रेंड तुमच्या कल्पनेपलीकडील ठरू शकते आणि हीच त्याची खासियत आहे. लव्ह पंजाब आणि अरदास या चित्रपटांनी हे म्हणणे खरे ठरवले आहे.' असे ट्रेड अॅनॅलिस्ट तरूण आदर्शने म्हटले आहे. ' लव्ह पंजाब' चित्रपटाने ऑस्ट्रेलिया व न्युझीलँडमधील फक्त एअरलिफ्ट चित्रपटाचा नव्हे तर बाजीराव मस्तानीचाही ओपनिंग वीक मधील रेकॉर्ड मोडला आहे. लव्ह पंजाब, अरदास आणि एअरलिफ्ट हे २०१६ सालातील ऑस्ट्रेलियातील टॉप ३ चित्रपट असून पहिले दोन चित्रपट पंजाबी आहेत, असे त्याने म्हटले.लव्ह पंजाबने ऑस्ट्रेलियामध्ये ४ लाख ६ हजार ६०१ डॉलर्स ( सुमारे २.७ कोटी रू) तर न्युझीलँडमध्ये ५१.९१ लाख रुपयांचा गल्ला जमवला.रणवीर सिंगच्या बाजीराव मस्तानीने ऑस्ट्रेलियातील बॉक्स ऑफीसमध्ये १.४४ कोटी रुपये तर न्युझीलँडमध्ये सुमारे २६.५० लाख रुपये कमवले. तर अक्षय कुमारच्या एअरलिफ्टने ऑस्ट्रेलियामध्ये सुमारे ९३ लाख रुपये आणि न्युझीलँडमध्ये अंदाजे ३६ लाख रुपये कमावले होते.
No comments:
Post a Comment