मुंबई: ‘देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्यांनी यांनी दिलेलं वचन आज पूर्ण केलं. हे आज पहिलं यश आहे. भक्कम पुरावं सादर केले असल्यानं भुजबळ आता पुढील 2 ते 4 वर्ष काही बाहेर येणार नाही.’ अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.
‘आम्ही दिलेलं वचन पूर्ण केलं असून आता समीर भुजबळांसोबत छगन भुजबळांना ऑर्थर रोड जेलमध्ये मुक्काम करावा लागणार आहे.’ असं सोमय्या म्हणाले.
‘छगन भुजबळ ही तर सुरुवात आहे. यानंतर आता 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणी सुनील तटकरे आणि अजित पवार यांनाही जेलमध्ये जावं लागणार आहे. एवढंच नव्हे आता एकापोठापाठ एक अटक सुरु होणार.’ असा ठाम विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment